Yoga Day या योगासनामुळे गर्भाशय राहिल निरोगी

Yoga Day

 

आज जागतिक योगा दिनमोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो.

आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्व लोकांना सांगितले जाते. योगासनाने मनासोबतच शारिरीक आरोग्य सुधारते. आयुर्वेदातही योगाचे महत्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी योगा दिनाच्या विविध थीम असतात. या ही वेळी मानवता या थीमवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अनेक आजारांवरचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे योगा. विशेषत: महिलांसाठी योगा करणे आवश्यक आहे. कारण काही काळानंतर महिलांना गर्भाशय, ओवेरियन तसेच स्तनाच्या कर्करोगाशी संघर्ष करावा लागतो. अशा अनेक महिला आहेत ज्या योग्य वेळी गर्भधारणा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, एक योग आहे ज्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. खास योग दिनानिमित्त योगाच्या माध्यमातून गर्भाशय आणि अंडाशय कसे निरोगी ठेवता येऊ शकते, यासाठी कोणती योगासने करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.

 

तितली आसन (Butterfly Pose Yoga):

गर्भाशय आणि अंडाशय निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी नियमित तितली आसन करणे गरजेचे आहे. या आसनाने तुमचे पाय लवचिक होतील तसेच गर्भाशय आणि अंडाशय निरोगी राहण्यासाठी मदत होते.

तितली योगा कसा करावा? 

सर्वप्रथम सूर्याकडे तोंड करून बसा.

यानंतर पाय अगदी सरळ ठेवा आणि मग पायाचे गुडघे वाकवून पायांचे तळवे एकमेकांशी जोडून घ्या.

आता हाताने पायाचे तळवे धरा. यानंतर दोन्ही डोळे बंद करा.

फुलपाखरासारखे दोन्ही पाय हलवा.

हे आसन पाच मिनिटे करा.

 

ज्या लोकांना गुडघ्याच्या तक्रारी आहेत त्यांनाही तात्काळ आराम मिळेल.फक्त तुमच्या पाठीसाठीच नाही तर हे आसन तुमच्या स्नायूंना आराम देते, अंडाशयात रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते आणि तुम्हाला अधिक फर्टाइल बनवते.

तितली योगा करण्याचे फायदे(Benefits of Butterfly Pose) :

1. तणाव दूर करण्यात प्रभावी.

2. खांद्यावरील ताण कमी होतो.

3. तुमच्या प्रजनन अवयवांना फायदा होतो.

4. लोअर बॅकचे दुखणे दूर करते.

5. गर्भवती महिलांसाठी उपयुक्त.

सेतूबंधासन (Bridge Pose):

या आसनामुळे आपल्या शरीर-मनाचा उत्तम समन्वय साधता येतो. सेतूबंधासन आपल्या शरीरातील ताण दूर करून आराम मिळवून देतो.नावाप्रमाणेच सेतुबंधासन म्हणजे संपूर्ण शरीर पुलासारखे बनवणे. हे आसन केल्याने पोटाचे, पाठीचे, पायांचे, हातांचे स्नायू बळकट होतात, तसेच गर्भाशयही निरोगी राहते. हे आसन केल्याने ज्या महिला गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांना खूप मदत मिळेल.

सेतुबांदासन कसे करावे? 

दीर्घ श्वास घ्या. पाठीवर उताणे झोपी जा. हलके हलके श्वास घ्या.
ह्यानंतर हात बाजूला ठेवा.
आता सावकाशपणे पाय गुडघ्यात दुमडून नितंबांजवळ आणावेत.
कंबर शक्य तितकी वर उचलून घ्या. हात जमिनीवरच ठेवा.
काही वेळापुरता श्वास रोखून धरावा.
यानंतर श्वास सोडत पुन्हा कंबर जमिनीवर टेकवावी. पाय सरळ करून विश्रांती घ्यवी.
१० ते १५ सेकंद विश्रांती झाल्यानंतर पुन्हा आसन करावे.
आपल्याला हे पाच वेळा पुन्हा करावे लागेल.

 

सेतूबंधासनाचे फायदे (Benefits of Setu Bandhasana):

1. छाती, मान आणि पाठीचा कणा यांत चांगला ताण निर्माण होतो.

2. पचनक्रिया सुधारून पचनशक्तीमध्ये वाढ होते.

3. ऍंक्झायटी, थकवा, कंबरदुखी आणि निद्रानाशासारख्या आजारात उपयुक्त.

4. पाठीचा कणा लवचिक बनवण्यास मदत.

5. मेंदूला शांतता मिळण्यास उपयोग.

6. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवते आणि थायरॉईडच्या त्रासात फायदेशीर

7. शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top