Wire Fencing Subsidy शेतीसाठी तार कुंपण योजना, शासन देणार 90% अनुदान

शेतीसाठी तार कुंपण योजना:

Wire Fencing Subsidy:

 

जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेवू शकतात. तार कुंपन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो, त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया…

तार कुंपण करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकांचे संरक्षण करता यावं, यासाठी शासनाकडून तार कुंपण अनुदान योजना (Wire Fencing Subsidy Scheme) सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून शासन शेती भोवताली काटेरी तार कुंपण ओढण्यासाठी जवळपास 90% अनुदान देत.

तार कुंपण योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या 4 विभागांमध्ये दिले जात आहे.

1. एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 %

2. दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60%

3. तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर 50%

4. पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40% पर्यंत अनुदान मिळणार आहे.

तर अशा पद्धतीचे हे अनुदान शेतकरी बांधवांना 70% पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहे आणि या तारकुंपन अनुदान योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास  करू शकता.

तार कुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी अटी खालील प्रमाणे आहेत:

1. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.

2. शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.

3. सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.

4. शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.

त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.

5. तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90% अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत.

6. तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.

 

योजनेचा अर्ज कोठे करायचा? 

तार कुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे.

विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.

त्यानंतर जे लकी ड्रॉ पद्धतीने याची निवड होणार आहे आणि यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला लवकरच कळवले जाईल.

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

1. सातबारा उतारा

2. गाव नमुना ८ अ

3.%जात प्रमाणपत्र

4. शेतकऱ्याचे आधार कार्ड

5. एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र

6. ग्रामपंचायतीचा दाखला

7. समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top