Soyabean Cotton Rate सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घटले. सोयाबीन 8000 तर कापूस 12000रू. पहा आजचे बाजारभाव

Soyabean Cotton Rate यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने अनेक शेतकरी आणि सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यामुळे आवक घटल्याने भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे बाजार समित्यांनी सांगितले आहे.

 

Soyabean Rate Maharashtra सोयाबीन : महाराष्ट्र राज्यात सरासरी क्षेत्र १५,७१,८६८ हेक्टर असून १९,८०,०९९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पिकावार विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन चां दर 7000 रुपये ते 8000 रुपये प्रति क्विंटल असल्याचे शक्यता आहे.

 

Cotton Rate Maharashtra कापूस :  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ४,३६,५१६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पीक सध्या पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचे पतंग व अंडी दिसून येत आहेत. पावसातील खंडामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येत असून उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे. यंदा कापसाचा भाव 12000 ते 15000 रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top