Senior Citizens Yojana ज्येष्ठ नागरिकांसाठी “या” सरकारी योजना ठरतील वृद्धपकाळातील आधार

ज्येष्ठ नागरिकांसाठी “या” सरकारी योजना ठरतील वृद्धपकाळातील आधार

Senior Citizens Yojana

 

तुम्हाला तुमचे म्हातारपण आरामात जगायचे असेल तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर जाण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत असते. या योजनेची माहिती जाणून घेऊयात.

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना:

ज्येष्ठ नागरिकांनासाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजनांनी जेष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली जात आहे. ही योजना 2007 मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती. जेष्ठ नागरिक पेन्शन, विधवा पेन्शन तसेच अपंगांना पेन्शन देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ फक्त 65 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊ शकतात. तसेच या योजनेअंतर्गत दर महिन्याला ज्येष्ठ नागरिक शासनाकडून पेन्शन सुद्धा दिली जात आहे. म्हणून अगोदरच या योजनेअंतर्गत दरमहा 600 रुपये पेन्शन मिळत होती, परंतु आता या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता या योजनेअंतर्गत दरमहा 1000 रुपये पेन्शन दिली जात आहे. म्हणून यासाठी एक रुपया सुद्धा भरण्याची गरज जेष्ठ नागरिकाला लागणार नाही. 100℅ अनुदानावर ही योजना राबवली जात आहे.

 

ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजेच सीनेजर सिटीजन कार्ड:

ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रमाणपत्र म्हणजेच काय तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी विभागाकडून सार्वजनिक कंपनी तसेच खाजगी किंवा व्यवस्थापना मार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती व सेवा. तसेच प्राधान्य सेवा मध्ये ऍडमिशन व प्रवेश सुलभ सोपा करण्यासाठी वयाचा प्रवाह म्हणून जेष्ठ नागरिक कार्ड, सीनियर सिटीजन कार्ड वापरू शकतात. तसेच या एसटीमध्ये प्रवास करताना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे व हे कार्ड असेल तर हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 60 वर्षे वय  असलेले व्यक्तींना 30℅ सवलत असते. म्हणून ही बराच लाभ देणारी ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे.ज्येष्ठ नागरिक कार्ड हे  ऑनलाइन काढता येते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना:
या योजनेचा लाभ 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीच घेऊ शकतात.  ही योजना 10 वर्षाची आहे. म्हणून प्रधानमंत्री वय वंदना योजना अंतर्गत 1 महिना, 3 महिने व 6 महिने तसेच वार्षिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. यापैकी कोणत्याही सुविधा लाभ घ्यायच्या असेल तर गुंतनुकदार स्वतः निवडू शकतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला वार्षिक 8℅ दराने व्याज मिळते. म्हणून या योजनेत 1000 रुपये ते 15 लाखापर्यंत केली जाऊ शकते आणि त्यातून परतावा सुद्धा मिळू शकतो.  ही योजना एक चांगली योजना राबवली जात आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना:

ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या वयाच्या 60 वर्षापेक्षा जास्त  असलेल्या नागरिकांसाठी अतिशय चांगल्या आणि सुरक्षित अशी प्रकारचे बचत योजना आहे. तसेच या योजनेमध्ये निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन म्हणून ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात. ही योजना भारत सरकारकडून सार्वजनिक राबवली जात आहे.

या योजनेच्या इतर कोणत्याही योजना पेक्षा जास्त फायदा आहे. या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये ते व जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेची मुदत 5 वर्षाची आहे. म्हणून या योजनेमध्ये 8.2% रकमेवर दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत किंवा पोस्टात खाते उघडून शकतात.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना / आयुष्मान भारत योजना  :

भारत सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य सेवेच्या महागाईमुळे मोठ्या संख्येने लोकांना वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. अशा लोकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. ती प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखली जाते. पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत, दरवर्षी नोंदणीकृत कुटुंबांना पाच लाखांचा आरोग्य विमा दिला जातो, ज्यामध्ये प्रथम तुम्हाला जन आरोग्य कार्ड बनवावे लागेल. त्यानंतर या योजनेंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही रुग्णालयात उपचार करता येतील. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांचाही समावेश आहे. देशभरातील १३ हजारांहून अधिक रुग्णालये या अंतर्गत येतात.

अशा प्रकारचे फायदे आहेत म्हणून वयाच्या 60 वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top