Scholarship मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती 2023

 

 

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी – मराठा, मराठा – कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. हि बाब लक्षात घेऊन क्यू- एस वर्ल्ड रँकिंग मध्ये 200 च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. ही योजना 2023 – 24 पासून राबवण्यात येणार असून सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील.

 

या अभ्यासक्रमांचा असेल समावेश

अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी 50 पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि 25 डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल.

 

या योजनेसाठी 5 वर्षाकरिता 275 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या वर्षासाठी 25 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top