Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना

शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत- त्यात संजय गांधी निराधार योजना आहे.

या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार, विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

 

लाभाचे स्वरूप

लाभार्त्यांस दरमहा रुपये ६००/- देण्यात येतात. 

एका कुटुंबात एका पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास कुटुंबाला रुपये ९०० प्रतिमाह अनुदान देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

1. वयाचा दाखला
2. रहिवासी दाखला
3. उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
4. अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी हॉस्ल्च्य रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला

अर्ज कसा करावा

अर्ज,निवास प्रमाणपत्र,वय प्रमाणपत्र,दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा
सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता / रोगाचे प्रमाणपत्र.
संपर्कः-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top