Rooftop Solar Subsidy विजबिल पासून सुटका, मिळवा सोलार रूफटॉप योजनेअंतर्गत अनुदान

Rooftop Solar Subsidy

रूफटॉप सोलर अनुदान योजना

 

 

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Rooftop Solar Yojana आहे.
आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून 40℅ पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल. तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे. त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान १ किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा २ अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.

रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी ४०℅ अनुदान देण्यात येते.
या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे जेणेकरून अर्जदार आपल्या मोबाइलला च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. त्यामुळे अर्जदारास शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
रुफटॉप सोलर योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील. राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
या योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल.

 

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
रूपटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी ३० पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.

1 किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाला 10 वर्ग मिटर जागेची गरज लागते.
एका परिवारातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते.

1. घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी शासनाकडून ४०℅ अनुदान दिले जाते.
2. ३किलोवॅट व त्यापेक्षा अधिक १० किलोवॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी २०℅ अनुदान दिले जाते.
3. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट विद्युत निर्मिती करणारे सौर उपकरणावर २०℅ अनुदान दिले जाते.
4. गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर २०% अनुदान दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. मोबाईल क्रमांक
3. अर्जदाराचे बचत बँक खाते
4. अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
5. अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
6. चालू विज बिल
7. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
8. अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
9. रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top