Rastriya Pashudhan Abhiyan Yojana पडीक जमिनीत वैरण पिकवा आणि मिळवा 100% अनुदान

पडीक जमिनीत वैरण पिकवा आणि मिळवा 100% अनुदान:

 

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून सतत विविध प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये नवनवीन योजनांचा, उपक्रमांचा व अभियानाचा समावेश असतो. यामागील शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे होय. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे.

पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जात आहे. यात वनक्षेत्र नसलेल्या नापिक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण बियाणे उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अंतर्गत राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरिता केंद्र सरकारची नवीन योजना मेंढी व वराह पालनाकरिता अनुदान देणारी योजना आहे. या अंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन व वराह पालन तसेच वैरण बी- बियाणे उत्पादनाकरिता 100% इतके अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेद्वारे दुग्धोत्पादनासोबत शेतीची प्रगती करावी, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना:

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांना पाळीव प्राण्यांपासून उत्पादन वाढीसाठी पडीक जमिनीवर वैरण उत्पादन घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100% अनुदान दिलं जात. शेती व्यवसायसोबत अश्या शेतीपूरक इतर व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पशुधन अभियान राबविल जात आहे. या अभिनयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा मानस आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत फक्त वैरणच नाही, तर खाद्य अभियान सेसुध्दा राबविले जातात. यामध्ये वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती, कुरणक्षेत्र आणि पडीक जमिनीवर वैरण उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येत.

 

राष्ट्रीय पशुधन योजना पात्रता:

1. लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. अर्जदारांकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असावी.
3. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.
4. केवायसीसाठी सर्व आवश्यक कागदपत्र लाभार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे.
5. लाभार्थी अर्जदारांकडे जमीनपट्टा असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण आणि खाद्य अभियान राबविल जातं. या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे विहित नमुन्यातील अर्ज करावा किंवा अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने NHM पोर्टलवर अर्ज करता येतो. अनुदानावर वैरण, बियाण्याच्या पुरवठ्याबाबत मागणी अर्ज, अर्जदाराच संपूर्ण नाव, गाव, तालुका त्याचप्रमाणे अर्जदारांची शेती बागायती आहे का? असेल तर किती ? इत्यादी माहिती अर्ज करताना द्यायची आहे.

कोणत्या जमिनीत घेता येते वैरण?

वनक्षेत्र नसलेल्या नापिक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण उत्पादनासाठी ही योजना आहे. संबंधित जमिनीवर वैरणीचे उत्पादन घेता येते; पात्र शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

100 %अनुदान:

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वैरण शेतीसाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान दिल जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पदरचा एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.

योजनेचे निकष काय?

लाभार्थ्याकडे वैरण उत्पादन करण्यासाठी स्वतःची जमीन, पाण्यासाठी सिंचनाची आवश्यकता आहे. लाभार्थ्याकडे स्वतःच्या मालकीची तीन किंवा चार जनावर असावीत. वैरण बियाण्याचे वाटप करण्यापूर्वी वैरण पिकाच्या लागवड बाबत मार्गदर्शन करणे, कोणत्याही प्रवर्गातील शेतकऱ्याला लाभ घेता येतो. यासह अनेक निकष आहेत. तशी माहिती जिल्हा तालुका पशुधन कार्यालयात उपलब्ध असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top