Post Office Fixed Deposit (FD) बँकेपेक्षा अधिक लाभ

Post Office Fixed Deposit (FD)

अलीकडच्या काळात बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर व्याजदर वाढवले ​​आहेत, ज्यामुळे निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी ते अधिक फायदेशीर ठरत आहेत. व्याजदरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर आता मुदत ठेव हा महागाईला तारणारा पर्याय बनत चालला आहे.

बँकेतील खात्यात रक्कम पडून राहण्यापेक्षा तिचा सदुपयोग करणे कधीही फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचा मंत्र प्रत्यक्षात उतरविल्यास तुम्हाला जास्त जोखीम न घेताही चांगला परतावा मिळू शकतो. त्यासाठी योग्य नियोजन करणे फायद्याचे ठरते.

पोस्ट खात्यातील या योजनांमध्ये तुम्हाला बँकेतील मुदत ठेवीपेक्षाही (Bank FD) अधिक परतावा मिळतो. पोस्टाच्या योजनांवर सर्वसामान्य गुंतवणूकदार आजही विश्वास ठेवतात.

बँकेच्या एफडीपेक्षा पोस्ट खात्यातील बचत योजनांवर तुम्हाला अधिक परतावा मिळतो. अनेक राष्ट्रीय आणि मोठ्या खासगी बँका बचत योजनांवर कमी व्याजदर देत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. सध्या पोस्ट खात्याच्या विविध बचत योजनांमधील व्याजदर जवळपास सर्वच बँकांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूक करताना या योजनांचा विचार करता येऊ शकतो.

मजबूत FD पोर्टफोलिओ तयार करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुमचे सर्व पैसे एकाच योजनेत गुंतवण्याऐवजी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अल्प आणि दीर्घकालीन एफडीमध्ये गुंतवणूक करणे होय. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत कर लाभ उपलब्ध असलेल्या ५ वर्षांच्या FD मध्ये एक भाग गुंतवा. तरलता लक्षात घेऊन उरलेले पैसे वेगवेगळ्या शॉर्ट टर्म FD मध्ये गुंतवू शकता. जर तुम्हाला असे करायचे असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीमसाठी गुंतवणूक करू शकता, जेथे वेगवेगळ्या कालावधीचेकालावधीचे 4 पर्याय उपलब्ध आहेत.

१ वर्ष ते ५ वर्षांचा पर्याय

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही मुदत ठेवीचा एक प्रकार आहे. १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांची FD करण्याचा पर्याय आहे. या विविध कालावधीच्या योजनांमध्ये ७.५℅ वार्षिक व्याज मिळत आहे. ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम अजिबात घ्यायची नाही आणि ठेवी सुरक्षित ठेवून चांगला परतावा हवा आहे ते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतात.

१ वर्ष TD: ६.८ % वार्षिक व्याज

ठेव : १० लाख रुपये
कालावधी : १ वर्ष
व्याज : ६.८% प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: १०,६९,७५४
व्याजाची रक्कम: ६९,७५४

२ वर्ष TD: ६.९% वार्षिक व्याज

ठेव : १० लाख रुपये
कालावधी : २ वर्षे
व्याज: ६.९% प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: ११,४६,६२५ रुपये
व्याजाची रक्कम: १,४६,६२५ रुपये

३ वर्षे TD: ७ % वार्षिक व्याज

ठेव : १० लाख रुपये
कालावधी : ३ वर्षे
व्याज : ७ % प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: १२,३१,४३९ रुपये
व्याजाची रक्कम: २,३१,४३९ रुपये

५ वर्ष TD: ७.५% वार्षिक व्याज

ठेव : १० लाख रुपये
कार्यकाळ : ५ वर्षे
व्याज : ७.५% प्रतिवर्ष
मॅच्युरिटीवर रक्कम: १४,४९,९४८ रुपये
व्याजाची रक्कम: ४,४९,९४८ रुपये

योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे

1. यात एकल आणि संयुक्त खाती उघडण्याची सुविधा आहे. संयुक्त खात्यात ३ प्रौढ असू शकतात.

2. या योजनेची खास गोष्ट म्हणजे एक गुंतवणूकदार अनेक खाती उघडू शकतो.

3. किमान १००० रुपये जमा केल्यावर कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. कमाल ठेवीवर मर्यादा नाही.

4. या योजनेत ५ वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर ITR  भरताना कर सवलतीचा लाभ मिळतो.

5. खाते सुरक्षितता म्हणून ठेवून त्याऐवजी तुम्ही कर्जही घेऊ शकता. सरकारी ठेव असल्याने कोणताही धोका नाही.

6. एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते हस्तांतरित केले जाऊ शकते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top