PM Maternity Scheme प्रधानमंत्री मातृवंदना योजना

प्रधानमंत्री मातृवंदना योजना (PMMVY) 
पहिल्या अपत्यानंतर 5,000 रुपये
दुसरी मुलगी झाल्यास 6,000रुपये

 

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू करण्यात आली. या अगोदर पहिल्या जिवंत आपत्तीसाठी शासनाकडून तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्याला 5000 रुपये दिले जात होते; परंतु आता दोनच हप्त्यात ही रक्कम खात्यात जमा होत आहे त्यातच दुसऱ्या पत्त्याच्या वेळी मुलगी जन्माला आल्यास लाभार्थ्याला प्रसुती नंतर एकाच वेळेस हजार रुपये दिले जात आहे.
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. महिला गर्भवती असताना आणि प्रसूतीनंतर त्यांना बुडीत मजुरी मिळावी, तसेच पोषणासाठी काहीसा आधार व्हावा यासाठी हे अनुदान योजनेच्या माध्यमातून दिले जाते.

 

नियमावलीत सुधारणा

1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर दांपत्याचे आधार कार्ड लागत होते, आता केवळ महिलेचे आधार कार्ड लागते.

2. शासकीय नोकरदार महिला, सहा महिन्यांची प्रसुती रजा मिळणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जात नाही.

3. पहिल्या जिवंत आपत्यासाठी याचा लाभ दिला जातो.

 

अर्ज कसा करावा

पूर्वी हा अर्ज एएनएम किंवा आशाताई, अंगणवाडीसेविकांच्या मदतीने भरावा लागत होता.आता आपल्या मोबाईलवरही हा अर्ज करता येतो. महिला व बाल विकास विभागांच्या वेबसाईटवर जाऊन हा अर्ज करावा लागतो.

 

पहिला हप्ता 3,000 रुपये

पहिल्या अपत्यावेळी मासिक पाळी बंद झाल्यानंतर एक तपासणी करून अर्ज ऑनलाईन करायचा. त्यानंतर आरोग्य विभागामार्फत अर्जाची छाननी होते. याला मान्यता देताच राज्यस्तरावरून लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होतात.

 

दुसरा हप्ता 2,000 रुपये

प्रसूती नंतर बाळाचे साडेतीन महिन्याचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसरा 2,000 रुपयांचा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केला जातो.

 

दुसऱ्या अपत्यानंतर 6,000 रुपये

दुसऱ्या अपत्य मुलगी झाली तर एकाच वेळी प्रसुतीनंतर महिलेच्या खात्यावर एकरकमी 6,000 रुपये जमा केले जातात.

 

पहिल्या अपत्यानंतर 5,000 रुपये
दुसरी मुलगी झाल्यास 6,000रुपये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top