Pandharpur Ashadhi Wari 2023 जाणून घ्या कसा होणार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा

Ashadhi Pandharpur Wari

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण आळंदी नगरी आज दुमदुमून निघालेली आहे. टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.

आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली

श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे.

तत्पूर्वी शनिवारी (दि.१०) संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रस्थानासाठी अनेक वारकरी देहूनगरीकडे मार्गस्थ झाले होते. संत तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रात्रीपासून आळंदीत दाखल होत आहेत. त्यामुळे सोमवारी आळंदीत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहोचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात.

असा असेल दिनक्रम?

पहाटे 4 वाजता – घंटानाद
पहाटे 4:15 वाजता – काकड आरती
पहाटे 4 :15 ते 5: 30 वाजता – पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती
सकाळी 5 ते 9 वाजता – श्रींच्या चलपादुकांवर भक्तांची महापूजा
सकाळी 6 ते 12 वाजता – भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, किर्तन, विणामंडप
दुपारी 12 ते 12:30 वाजता – गाभारा स्वच्छता, समाधीवर पाणी घालणे आणि महानैवेद्य
दुपारी 12:1 वाजता – भाविकांना समाधीचं दर्शन
सायंकाळी 4 वाजता – पालखीचं प्रस्थान होईल

कसा असेल आषाढी वारी पालखी सोहळा?

सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम करेल. 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्कामी असेल. 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल. 19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान करेल. 22 जूनला बरड मुक्काम असेल. 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top