MHT-CET Result 2023 12 जूनला लागणार सीईटीचा निकाल

जून लागणार MHT CET चा निकाल

MHT CET Result 2023

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे.

सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. निकाल 12 जून 2023 रोजी लागणार आहे. एकदा जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा निकाल cetcell.mahacet.org वर पाहू शकतील.निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून वेबसाइटवर लॉग इन करणे आवश्यक आहे. MHT CET 2023 च्या निकालामध्ये एकूण पर्सेंटाइल स्कोअर तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताच्या विषयानुसार गुणांचा उल्लेख असेल.

निकाल कसा पाहायचा? 

cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

MHT CET 2023 च्या निकालावर क्लिक करा.

एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आवश्यक असेल.

सबमिट’ बटणावर क्लिक करा.

MHT CET 2023 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.

MHT CET निकाल/स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्डची प्रिंटआउट घ्या.

त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल लागल्यानंतर होईल. कॅप राऊंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.

प्रवेशासाठी आता प्रथमच मोबाईल ॲपचा वापर
प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून प्रथमच मोबाईल ॲपद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया बाबतची विविध माहिती, सूचना आणि जागावाटप आदी माहिती ॲपद्वारे उमेदवारांना मिळणार आहे. मोबाईल ॲपचा विद्यार्थी आणि पालक यांना मोठा फायदा होणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:
प्रवेश प्रक्रिया राबविताना ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस(API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे.
1. बारावी मार्कशीट
2. आदिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
3. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जात प्रमाणपत्र
4. जात वैधता प्रमाणपत्र
5. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
6. कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश याकरिता लागणारा सातबाराचा उतारा
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र
दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश नियमांक प्राधिकरणाकडून देण्यात येणारे मान्यतेबाबत संस्था, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडी मध्ये कळविण्यात येणार आहेत.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2023 – 24 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधि मार्गदर्शन पालक आणि उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
CET दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top