Mahila Sanman Bachat Yojana महिला सन्मान बचत योजना

महिला सन्मान बचत योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली होती. ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. या योजनेवर 7.5% दराने व्याज मिळते.

महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र अशी योजना जाहीर केली होती. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर ही योजना 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली.

भारत सरकारने देशातील महिलांचा गुंतवणुकीत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी डाग घरात महिला सन्मान बचत योजना(Mahila Sanman Bachat Yojana) ही नवी योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर केवळ दोन वर्षात 7.5% व्याज दिले जाईल. महिला सन्मान बचत योजना ही एक वन टाइम गुंतवणूक करण्याची योजना आहे.

महिला सन्मान बचत योजनेचा व्याजदर

ही योजना विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना असून महिला या योजनेत खाते उघडून त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात. महिला सन्मान बचत पत्र म्हणजे MSSC योजना 2025 पर्यंत किंवा 2 वर्षांसाठी असून या बचत योजनेत 7.5% व्याज दिले जाईल. महिला किंवा तुमच्या मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.

नफा किती होईल? 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा 2 लाख रुपये आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला 7.5% निश्चित व्याज दराने परतावा म्हणजे या योजनेत तुम्हाला एका वर्षात 15,427 रुपयांचा परतावा मिळेल. तर 2 वर्षांत 32,044 रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, या योजनेतील तुमची 2 लाख रुपयांची गुंतवणूक 2 वर्षांत 2.32 लाख रुपये होईल.

योजना जाणून घ्या सविस्तर:

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. याशिवाय तुम्ही या योजनेत गुंतवलेली आंशिक रक्कम काढू (विथड्रॉ) शकता. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत भौतिक MSSC पावती मिळवण्यासाठी तुम्हाला 40 रुपये तर तुम्ही ऑनलाइन पावती घेतली तर तुम्हाला 9 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, 100 रुपये टर्नओव्हर पेमेंटसाठी  6.5 पैसे आकारले जातील.

योजनेची वैशिष्ट्ये

1. या योजनेमध्ये कमीत कमी 1000 रुपये पाणी जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करू शकता.

2. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र MSSC यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5% याप्रमाणे व्याज मिळते.

3. यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकता.

4. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेऊ शकताशकता, म्हणजे या कालावधीमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2 वर्षानंतर मुद्दल व्याजासकट मिळेल.

5. मुदतपूर्व खाते सहा महिन्यानंतरच बंद जाऊ शकते.

6. भारत सरकारच्या तीमाही व्याज दरामध्ये जसे बदल होतील त्याप्रमाणे रक्कम मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top