Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana (MJPJAY) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये मोठा बदल

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

६० वर्षावरील नागरिकांना दिलासा, वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी.

 

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवत असतात. त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांना सामील केले गेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रशासनाची एक आरोग्य विमा योजना आहे.

राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जण आरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने हि अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून मोफत उपचार मिळावेत यासाठी योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये सर्व ज्येष्ठांचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी शासनाकडून करण्यात सह्याद्री विश्रामगृहात शनिवारी बैठक झाली होती. त्यात करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या सूचनांमुळे ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, राज्य कामगार विमा रुग्णालय, महापालिका, नगरपालिका रुग्णालयामध्ये त्या त्या परिसरातील सर्व 60 वर्षावरील नागरिकांची दोन वेळा मोफत तपासणी करावी.

यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड देण्यात येऊन सुपर स्पेशलिटी रुग्णालयत सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जन आरोग्य योजनेमधील अटी शिथिल करून सर्व ज्येष्ठांचा समावेश करावा.

राज्यातील ज्येष्ठांची दीड कोटी संख्या लक्षात घेता सर्व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांच्या तपासणीसाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात यावेत. तसेच पॅलेटिव्ह केअर वार्ड ची टप्प्याटप्पने वाढ करावी, अशा सूचनाही बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top