Maharashtra Talathi Recruitment 2023 महाराष्ट्रमध्ये 4625 जागांसाठी तलाठी पदाची मेगा भरती 2023

Maharashtra Talathi Recruitment 2023 (महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023) :

महाराष्ट्र शासन लवकरच तलाठी भरतीची अधिसूचना जाहीर करणार आहे. दि. 03 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 चा ड्राफ्ट जाहीर झाला आहे. या ड्राफ्ट मध्ये तलाठी भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एकूण 4625 जागेसाठीची अधिसूचना जाहीर होणार आहे. महाराष्ट्र तलाठी मेगा भरती बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही काही बदल असल्यास यात अपडेट करू. या लेखात तलाठी भरती 2023 मधील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, तलाठी भरतीचा अभ्यासक्रम, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अधिसूचनेचा ड्राफ्ट  (Notification Draft):

राज्यातील तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात एक अद्ययावत माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत दिनांक 03 जून 2023 रोजी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अधिसूचनेचा ड्राफ्ट जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार लवकरच अधिकृत अधिसूचना जाहीर होणार असून Maharashtra Talathi Bharti 2023 च्या नोटीफिकेशन ड्राफ्ट नुसार तलाठी भरती 2023 ची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 च्या दरम्यान घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अधिसूचनेचा ड्राफ्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

रिक्त पदांचा तपशील (Talathi Vacancy 2023):

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या काही दिवसात 4625 पदांसाठी महाराष्ट्र तलाठी भरती 2023 राबविण्यात येणार आहे. विभागानुसार रिक्त पदांचा माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. नाशिक विभागात रिक्त पदे 982, छत्रपती संभाजी नगर विभागात (औरंगाबाद) रिक्त पदे 939, कोकण विभागात रिक्त पदे 838, नागपूर विभागात रिक्त पदे 707, अमरावती विभागात रिक्त पदे 191, पुणे विभागात रिक्त पदे 887 आहेत. 

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification):

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे

1. कोणत्याही शाखेतील पदवीधर
2. MSCIT किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता
3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वय ( Age Limit):

सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 40
मागास प्रवर्ग: 19 ते 45

अर्ज शुल्क (Application Fee):

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.

सर्वसाथारण प्रवर्ग: रु. 1000
मागास प्रवर्ग: रु. 900

ऑनलाईन अर्ज तारीख:

येत्या काही दिवसात तलाठी भरती 2023 ची जाहिरात येणार आहे. 4625 पदांची भरती होणार आहे. सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. तलाठी भरती ची अधिसूचना आल्यावर तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती या लेखात प्रदान करण्यात येईल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top