Maharashtra SSC Board Result 2023 उद्या लागणार दहावीचा निकाल

Maharashtra SSC Board Result 2023:

दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23010 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

उद्या शुक्रवारी म्हणजे 2 जून परीक्षेचा निकाल लागणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

निकाल कुठे चेक कराल?

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

खालील प्रमाणे निकाल चेक करा.

इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.

त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका.

निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल.

मार्कशीट चेक केल्यानंतर तुम्ही प्रिंट घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top