Lek ladki Yojana महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी योजना, मुलींना मिळणार 75,000 रुपये

लेक लाडकी योजना, मुलींना मिळाला 75000 रुपये

 

 

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5000 रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना 4000, सहावीत असताना 6000 आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8000 रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75000 रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

लेक लाडकी योजनेचे फायदे

महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे खालील प्रमाणे आहेत.

1. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.

2. मुलगी चौथीत असताना 4,000 रुपये मुलीच्या नावावर जमा केले जातील.

3. सहावीत असताना 6,000 रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.

4. मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000  रुपये जमा केले जाते.

5. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख मिळतील.

योजनेचा उद्देश काय आहे? 

महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. मुलींच्या गर्भ पात यावर आळा घालने, मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेक लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.

पात्रता

1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2. लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.

3. राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

4. या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.

5. लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

1. मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड.

2. मुलीचे आधार कार्ड

3. मुलीचा जन्म दाखला

4. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला

5. पासपोर्ट साईज फोटो

6. मोबाईल नंबर, ईमेल आयडी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top