Krushi Update 2023 मध्ये घ्या जाणून खताचे भाव

2023 मध्ये घ्या जाणुन खताचे भाव

 

 

 

रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाली आल्या असून रासायनिक खतांवर केंद्र सरकारच्या अनुदानामुळे यंदा खतांच्या किमती स्थिर आहेत किंवा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही खताची सध्याची किंमत किती आहे, तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे ते खत उपलब्ध आहे की नाही, जवळच्या दुकानदाराचा मोबाईल नंबर, किती साठा उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता.

खताची सध्याची किंमत कशी तपासायची, जवळच्या दुकानदाराकडे साठा आहे की नाही हे तपासण्यासाठी मोबाईल अॅप बनवण्यात आले आहे.या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये खताची किंमत तपासू शकता.

Google मध्ये किसान सुविधा (शेतकरी सुविधा) शोधून, तुम्हाला ही वेबसाइट (https://kisansuvidha.gov.in) दिसेल. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला 2 क्रमांकावर Fertilizer नावाचा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला विविध ग्रेडच्या खतांच्या किमती बघायला मिळतील, किंमतीसोबतच तुम्हाला जवळच्या दुकानदाराचा मोबाईल नंबरही मिळेल.

जवळच्या दुकानदाराकडे खताचा साठा आहे की नाही, दुकानदाराकडे किती साठा आहे, त्याची किंमत काय आहे, याची संपूर्ण माहिती शेतकरी पाहू शकतात. दुकानदाराचा मोबाईल क्रमांकही उपलब्ध असेल, शेतकरी फोन करून चौकशी करू शकतात किंवा माहिती मिळवू शकतात.

ही माहिती कशी पहावी याची संपूर्ण माहिती खालील व्हिडिओमध्ये विस्तृत दिलेली आहे. https://youtu.be/ssSduGC94Qk

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top