Janaarogya Yojana राज्यातील प्रत्येक कुटुंबाला जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण कवच

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना 2023:

 

 

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताच विचार करत राज्य शासन काही योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना दिसतं आहे. किमान प्रक्रियेतून कमाल फायदा देणाऱ्या या योजना अनेकांना मोठा मदतीचा हात देतात. त्यात आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट जोडली जाणार आहे, ती म्हणजे आरोग्याबाबतच्या नियोजनाची.

राज्य शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अधिवास प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका धारक नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे. थोडक्यात केशरी आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांपुरता सीमित असणारी ही योजना आता सरसकट इतरही नागरिकांना लागू होणार आहे.

राज्यशासनानं बुधवारी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत या योजनेचं केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेशी एकत्रीकरण करत आरोग्य कवच प्रति कुटुंब प्रतिवर्षी 1.5 लाखांवरून थेट 5 लाख रुपये करण्याचं ठरवलं आहे. परिणामी राज्यातील प्रत्येक कुटुंब म्हणजेच साधारण 12 कोटी नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 इतक्या उपचारांचा समावेश आहे. परिणामी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्र येण्यानं दोन्ही योजनांमध्ये असणाऱ्या सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे. राज्याची जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकात्मिक योजनेसाठी यापुढे एकच कार्ड दिले जाणार आहे. 

मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण 2.5 लाख एवढी होती. ती आता 4.5 लाख रुपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजना कसं काम करणार?

– योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील जवळच्या नागरिकांनी शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.

– ग्रामीण भागातील नागरिकांनी शासकीय आरोग्य शिबिरांमध्ये जाऊन आजाराची तपासणी करावी.

– आजाराची खात्री झाल्यानंतर रुग्णाच्या रोगाची आणि खर्चाची माहिती आरोग्य मित्रांना दिली जाईल.

– 24 तासांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होऊन उपचार सुरु होतात.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top