दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

माध्यमिक व उचमध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा १ मार्च पासून सुरु होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उचमध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी _बारावी परीक्षाच्या तारखा जाहीर केल्या आहेत बारावीची परीक्षा २१फेब्रुवारी २०२४पासून २३मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १मार्च २०२४पासून २६मार्च २०२४पर्यंत होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उचमध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च मध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी )सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम -बुधवार, दि.२१फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि.१९मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

उच मध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी )व्यवसाय अभ्यासक्रम -बुधवार, दि.२१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दि.१९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होतील.

माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा (१२वी )_बुधवार, दि.२० मार्च ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४ या कालावधी मध्ये होईल.

तर माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी )_शुक्रवार, दि.१ मार्च २०२४ ते मंगळवार, दि.२६ मार्च २०२४ या कालावधी मध्ये होणार आहे.

तसेच दहावी प्रत्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि.२९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार, दि २ फेब्रुवारी ते मंगळावर, दि २० फेब्रुवारी २०२४ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top