Gatha marathi recipe घरच्या घरी झटपट बनवा गार्लिक ब्रेड, मायक्रोवेव्हची गरज नाही

Garlic Bread Recipe

गार्लिक ब्रेड रेसिपी

 

विशेष म्हणजे हा गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्हचीही गरज नाही.
आत्तापर्यंत तुम्ही बाजारात मिळणारा गार्लिक ब्रेडच खाल्ला असेल. हा ब्रेड लोक क्वचितच घरी बनवतात. मायक्रोवेव्ह या गोष्टीचा अभाव हे त्याचे कारण आहे. पण, तुम्ही क्रिस्पी चीज गार्लिक ब्रेडही घरी अगदी सहज बनवू शकता. विशेष म्हणजे ते बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य आणि वेळ लागणार नाही. खूप कमी पदार्थासह घरी गार्लिक ब्रेड बनवू शकता, जो कमी वेळेत तयार होईल.

 

झटपट बनवा घरच्या घरी गार्लिक ब्रेड

साहित्य:
ब्रेड, बटर, 7-8 लसूण पाकळ्या अगदी बारीक वाटून, चिमूटभर मीठ, रेड चिली फ्लेक्स, ऑरगॅनो, किसलेले चीज

कृती:
1. ब्रेड स्लाईसेस तव्यावर थोडं बटर घालून कुरकुरीत करून घ्यावेत. (पूर्ण भाजू नयेत)
2. बटर गरम करून त्यात वाटलेले लसूण, रेड चिली फ्लेक्स, ऑरगॅनो व थोडं मीठ घालून छान पेस्ट करून घ्यावी. हे आहे गार्लिक. बटर तुम्ही एक आठवडा सहज फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता.
3. एका बेडवर थोडं गार्लिक बटर लावून त्यावर चीज किसून घ्या. तुम्ही मोझरेला चीज पण घेऊ शकतात दुसऱ्या ब्रेडला गार्लिक बटर लावून त्यावर ब्रेड ठेवा.
4. तव्यावर किंवा कढईत थोडं बटर टाकून दोन्ही ब्रेड छान सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. आणि चीज वितळे आहे याकडे पण लक्ष द्या.
5. तयार गार्लिक ब्रेड काढा आणि गरमागरम सॉस, चटणी किंवा तुमच्या आवडत्या डीप सोबत खा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top