Fruit Crop Insurance या जिल्ह्या फळपिक विमा योजना 2023 नोंदणीला सुरुवात

फळपिक विमा योजना 2023

 

 

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२३-२४ मृग बहरामध्ये डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी आणि सीताफळ या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून, अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. पंतप्रधान पीकविमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे.

उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसानभरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येते.

फळपीक विमा योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत:

१. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे.
२. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण देणे.
३. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थेर्य अबाधित राखण्यास मदत करणे.
४. कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राचा विकास आणि गतिमान स्पर्धेतत्मक वाढ , पिकांचे विविधिकरण हे हेतू साधता येतील.

कोणत्या फळपिकांसाठी विमा योजना लागू असणार ?

मृग बहारसाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ व लिंबू ही ७ फळपिकांसाठी १८ जिल्यांमध्ये तर,अंबिया बहारसाठी संत्रा मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा, केळी, द्राक्षे व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी या ८ फळपीकांचा २३ जिल्यांमध्ये समावेश करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी खालील प्रमाणे आहेत:

विमा कंपनीचे नाव व पत्ता – जिल्हे

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.नगर, अमरावती, नाशिक, वाशीम, धुळे, सोलापूर

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, सातारा, परभणी, जालना, लातूर. 

भारतीय कृषी विमा कंपनी लि. –  बुलडाणा, जळगाव, पुणे, धाराशिव. 

 

प्रति हेक्टरी भरावा लागणारा हफ्ता & शेवटची तारीख (Premium Installment & Last Date ):

फळपीक    प्रति हेक्टरी हफ्ता    शेवटची तारीख
संत्रा           रु. 4,000/-           14 जून 2023
मोसंबी        रु. 4,000/-           14 जून 2023
डाळिंब        रु. 6,500/-           14 जुलै 2023
पेरू            रु. 3,000/-           14 जून 2023
लिंबू            रु. 3,500/-           14 जून 2023
चिकू           रु. 3,000/-            30 जून 2023
सीताफळ     रु. 2,750/-           31 जुलै 2023

 

विमा अर्ज करण्यासाठी फळबागांचे वय खालीलप्रमाणे असले तरच अर्ज करता येणार आहे.

चिकू – ५ वर्ष
संत्रा, मोसंबी, पेरू – ३ वर्ष.
लिंबू – ४वर्ष
द्राक्षे डाळिंब – २ वर्ष
यापेक्षा कमी वय असणाऱ्या बागांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद अर्ज करण्यापूर्वी घ्यावी.

योजनेचा हप्ता कुठे भरावा:
या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था, तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा.

संपर्क

संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top