Falbag Lagwad Yojana 2023 आता 100% अनुदान मिळणार फळबाग लागवड योजना

फळबाग लागवड योजना 2023

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ पासून सुरु करण्यात अली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे.

ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग शेतीला हि प्रोत्साहन मिळणार आहे.

फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत राबविली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हे. तर इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.

पात्रता
1. लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
2. सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
3. लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
4. शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
5. परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
7. इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

100% अनुदान खालील प्रमाणे मिळेल:

1. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर निवड होण्यास काही कालावधी लागू शकतो.
2. निवड झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
3. शेतकऱ्याने झाडे लावल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान हे तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे.
4. पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान मिळणार आहे.
5. दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान मिळणार आहे.

http://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या पोर्टल वरती अर्ज करू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top