Educational scholarship :शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!!’या विद्यार्थ्यांना मिळणार 3 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. शाळेतील मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य मिळावे ;या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना 600रुपयांपासून 3 हजारा पर्यंतची आर्थिक मदत सरकार करत आहे. त्यामुळे या योजनेचा अधिक मुलींनी लाभ घ्यावा ; असे आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. जाणून घेऊया सविस्तर…

या विध्यार्थिनींना होणार शिष्यवृत्तीचा फायदा

सावित्रीबाई फुले मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सर्व (Educational scholarship )शाळामधून समाज कल्याण विभागाकडे विध्यार्थिनीची माहिती पाठवण्यात येते. या माहितीची पडताळणी केल्यानंतर विभाग शिष्यवृत्ती मंजूर करते. पुढे मंजुरी मिळाल्यानंतर संबधित विध्यार्थीनींच्या थेट बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्क्म पाठवण्यात येते. परंतु या शिष्यवृत्तीचा लाभ फक्त पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना घेता येत आहे. यासाठी मुलींची वर्गातील दैनंदिन उपस्थीती अनिवार्य आहे.

काय आहे पात्रता (Educational scholarship )

मुख्य बाब म्हणजे, पाचवी ते सातवीतील विध्यार्थिनीची किमान 75 टक्के उपस्थिती असल्यासच त्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यास समाज कल्याण विभाग मंजुरी देते. आणि अशा मुलींचीच नावे शाळेकडून पाठवण्यात येतात. या शिष्यवृत्ती अंतर्गत पाचवी ते सातवीतील विध्यार्थिनींना 600 रुपये दिले जातात. तसेच, आठवी ते दहावीतील विध्यार्थिनींना प्रतीवर्षाला 1हजार रुपये शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येते.

ही कागदपत्रे आवश्यक आहे

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. यासोबत 1. विद्यार्थिनींच्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला, 2. मुख्याध्यापकाचा संबंधित प्रवर्गाच दाखला, 3.जातीचा दाखला, 4. बँक खाते ;अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top