Digital Satbara मोबाईल ॲप वरून मिळणार डिजिटल सहीयुक्त सातबारा

डिजिटल सातबारा मिळणार आता मोबाईल ॲपवर

“उमंग”ॲप वरून मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा सातबार

 

 

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी आता डिजिटल सातबारा उपलब्ध केला आहे. आता हा सातबारा केंद्र सरकारच्या उमंग मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे.

कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणारा असून, शासकीय कार्यालय व महा-ई-सेवा केंद्रावर जाण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.

शुल्क:

महसूल विभागाने विकसित केलेल्या महाभूमी या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर सातबारा उतारा, ८ अ उतारा उपलब्ध होत आहे. या महाभूमी पोर्टलवर पंधरा रुपयांत सातबारा उतारा मिळत आहे. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे १५ रुपयांच्या सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. पोर्टलवर ही सुविधा केवळ १५ रुपयांत देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उमंग मोबाइल ॲपवर डिजिटल स्वरूपात उतारा उपलब्ध होणार असून, त्याची प्रिंट न काढताच अन्य व्यक्तीला अथवा कार्यालयांना तो पाठवता येईल.

तसेच याच ॲपवरून आपल्याला खात्यावर पैसे भरता येतील.विशेष म्हणजे ॲपवरूनच सातबारा वरील डॉक्युमेंट आयडीवरून त्याची अचूक पडताळणी करता येईल. शेतकऱ्यांना आता मोबाईलवर सुविधा झाली आहे.

 

डिजिटल सातबारा कसा काढायचा?

सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 किंवा ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल.

यावर तुम्ही क्लिक केल्यास ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी इथं आला असेल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढता येईल.
ते कसं तर त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Enter Mobile Number च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.

याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTP च्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.

त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

यातल्या Digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.”
याचा अर्थ सातबाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.

आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.

ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर परत गेले, तर तिथं तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा असल्याचं दिसेल.
आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे.

यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे.

त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.

 

महाभूमीवर असणारे सर्व सातबारे व इतर महत्त्वाचे डिजिटल दस्तऐवज उपलब्ध होणार आहेत.त्याची उपलब्धता अतिशय सहज सोपी आहे. उमंग ॲपवर अकाउंट तयार करून त्यात पैसे जमा करून घेतले जातील.त्यासाठी 15 रुपये आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी सामान्य नागरिकांचा वेळ पैसा वाचणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top