Chiku Crop Insurance Scheme चिकू फळ पिकासाठी विमा योजना 2023, करा लगेच अर्ज

चिकू फळ पिकासाठी विमा योजना 2023
Chiku Crop Insurance Scheme

 

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो. राज्यातील 26 जिल्ह्यामधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आलेली असून मृग बहारासाठी म्हणजेच खरीप फळ पिकविमा योजना सुरू झालेली आहे. विमा योजनेत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

चालू वर्ष 2023-24 साठी फळबागांना हवामान आधारित विमा अर्ज मागविण्यात येत असून कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास, अशा प्रकारचे घोषणापत्र त्यांना द्यावे लागेल, अन्यथा त्यांचा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे.

मृग बहार-२०२३ मध्ये चिकू पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

चिकू फळपिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. चिकू बाग वय वर्ष ५ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण रक्कम – ६०,००० रुपये प्रति हेक्टर

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता – ३००० ते १८,००० हजार रुपये प्रति हेक्टर. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ % च्या मर्यादेत असतो. मात्र, एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५% हून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५०% भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरावयाच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) – विमा संरक्षण कालावधी – प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

जास्त आर्द्रता व जास्त पाऊस

– १ जुलै ते ३० सप्टेंबर

– या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग ५ दिवस ९०% पेक्षा जास्त राहिल्यास आणि प्रति दिन २० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रु. २७,०००

– या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग १० दिवस ९०% पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रु. ६०,०००

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी

विमा कंपनीचे नाव व पत्ता – जिल्हे

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – नगर, नाशिक, पालघर, सोलापूर

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. – बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, ठाणे, परभणी, जालना.

भारतीय कृषी विमा कंपनी लि. – बुलडाणा, जळगाव, पुणे, धाराशिव.

योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक -३० जून २०२३.

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग:

1) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहीत इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

2) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

3) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकावरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विससेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

4) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरासाठी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

5) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

6) शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

7) शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.

 

फळपीक विम्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे आहेत:
1) आधारकार्ड
2) जमिनीचा 7/12 उतारा
3) 8अ उतारा
4) पीकपेरा स्वयंघोषणापत्र
5) बँक पासबुक
6) फळबागेचा टॅगिंग केलेला फोटो
7) सामायिक क्षेत्र संमतीपत्र (आवश्यक असल्यास)

संपर्क:

संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top