Breaking News राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, GR निर्गमित

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर

 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बाबतीत दि. 2 जून 2023 रोजी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते . सन 2023- 24 आर्थिक वर्षाकरिता मागणी एक्स-१ मुख्य लेखाशीर्ष 2226 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अधिकारी/कर्मचारी यांचे महिना एप्रिल ते मे 2023 च्या वेतनाकरिता 134,60 .80 लक्ष रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे .

यामध्ये पोषण आहार या लेखाशीर्ष करिता 831 लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहेत .तर अंगणवाडी सेवा आस्थापना करिता 217 लाख रुपये, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी 2173 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे .

त्याचबरोबर जिल्हा परिषद आस्थापना साठी 1481 लाख इतका निधी अदा करण्यात आलेला आहे. अतिरिक्त राज्य हिस्सा वेतन अनुदाने याकरिता 1227लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे .

सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे राहतील. त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष, वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन करावे. 

सदर निधी वितरण शासन निर्णयामुळे राज्यातील वरील नमूद कर्मचाऱ्यांचे महिना एप्रिल व मे 2023 चे वेतन वेळेत अदा करण्यात येणार आहेत .

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top